मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट प्रदेश सचिवपदी अनिल नन्नवरे

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बांभोरी येथील अनिल नंन्नवरे यांची मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट, नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून संस्थापक व राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिनेश गुप्ता यांनी नुकतीच नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती केली.

अनिल नंन्नवरे हे गेल्या सोळा वर्षांपासून अखिल भारतीय कोळी समाजाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत समाजात नेहमी सामाजिक विविध उपक्रम  व कार्यक्रम आयोजित करून गरजवंताना सहकार्य करत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश आई.टी.सेल सचिव डॉ. राजनराम जैसवार, राष्ट्रीय प्रभारी श्री.संजय मेवालाल गुप्ता व मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

अनिल देविदास नंन्नवरे यांचे निवडीचे परेशभाई कोळी, राज्य युवा अध्यक्ष, अखिल भारतीय कोळी समाज, बांभोरी उपसरपंच भिकन नंन्नवरे,गोपालशेठ नंन्नवरे, रवीशेठ नंन्नवरे, धनराज साळूंके, प्रवीण कुमार बाविस्कर, योगेश बाविस्कर, हिरालाल वाकडे आदींनी अभिनंदन केले.

Protected Content