धुळे । राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी Anil Gote माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एका पत्रकातून सडकून टीका केली असून हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. बघा, गोटे नेमके काय म्हणालेत ते ?
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी एक पत्र सोशल मीडियात व्हायरल केले असून यावरून सोशल मीडियात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. आपल्यासाठी हे पत्र जसेच्या तसे सादर करत आहोत.
फडणवीस सरकारमथील मंत्री हे चिंचोके गोळा खात होते का ?
दिवसागणीक वाढाणारी महागाई, पेट्रोल, डिझेलच्या दैनंदिन भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या जनतेला सामोरे जाण्याची नैतीकता शिल्लक राहीली नाही. उघडपणे भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांचे समर्थण करुन जनतेच्या रोषाला तोंड देण्याची हिमंत नाही. आपल्या डरपोकपणावर शिक्कामोर्तब होऊ नये. यासाठीच त्यांचे आकांड तांडव चालले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळातच गृहखात्याची वाट लागली. मनाला येईल त्याप्रमाणे बदल्या करायच्या पोलीस यंत्रणेचा वापर करुन विरोधकांनाच नव्हे तर, माजबेज असलेल्या ओबीसी नेत्यांना संपविण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पोलीस यंत्रणेला कसे वेठीस धरले होते. अशा असंख्य प्रकरणांची माझ्याकडे जथ्थी आहे.
अपंग शिक्षकांच्या नावाने चाललेल्या बोगस संस्थांमधील हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराची देवेंद्र फडणवीसांना Anil Gote मी स्वत: माहीती दिली. त्यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीचा फार्स झाला. थोड्या थोडक्या नव्हे तर, ९०० ते ११००शे शिक्षकांना प्रत्येकी किमान
१० लाख रुपये घेऊन. जिल्हा परिषदेच्या सेवेकडे वर्ग केले. एकट्या धुळे जिल्ह्यातच असे शेकडो शिक्षक होते. देवेंद्र फडणवीसांना मी स्वतः कुठल्या मंत्र्यांनी कुठल्या आयुक्ताच्या मदतीने पैसे गोळा केले, किती नंबरच्या गाडीतून पैसे कुठे आले, कुणाकडे उतरवले, याची विस्तृत माहीती दिली. सदर मंत्र्यांवर कारवाई करण्याएवजी फडणवीसांनी त्यांना क्लिनचीट
दिली.
सदर घटना तत्कालीन महसूल मंत्री आणि ज्यांच्या प्रेरणेने आणि आग्रहाने मी भाजपाची उमेदवारी घेतली. असे, नाथाभाऊ खडसे यांच्या रामटेक’ या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कानी घातली. नंतर मला सुचविण्यात आले. की, गोटेसाहेब ‘हे सर्व पैसे काही मंत्र्यांच्या घरात जात नाहीत. तर, पक्षनिधी जमा केला जातो, तुम्ही कशाला पाण्यात राहून मगरीशी वैर घेता ?’
तरी सुध्दा मी हा विषय फडणवीसांकडे वारंवार उपस्थित करीत होतो. तेही निर्वीकार चेहर्याने व कोडगेपणाने आपण गांभीर्याने या भ्रष्टाचाराची चौकशी करीत आहोत. असे मला भासवत होते. नाशिक, जळगाव महापालीकेच्या निवडणुकांमध्ये डझनानी पक्षप्रवेश करुन घेऊन पाण्यासारखा पैसा उधळुन म्हणजे सत्ता काळात कमवलेले काळे पैसे वापरुन, यश विकत
घेतले. याला काय स्वतंत्र पुराव्याची आवश्यकता आहे का. माझा देवेंद्र फडणवीसांना सरळ सरळ सवाल आहे की, भ्रष्टाचारावर बोलण्याचा तुम्हाला काहीएक अधिकार नाही. ती नैतिकताच तुम्ही केव्हाच गमावीली आहे. उगाच नाक वर करुन आणि लांब जिभ काढून तुम्ही केलेल्या आक्रस्ताळेणावर कुणी काडीचा सुध्दा विश्वास ठेवत नाही. भाजपाच्या आय.टी. सेल मध्ये भरती केलेले तुमचे पाळीव आणि पगारी कर्मचारीच ‘पादलासे सुगंधासु’ असे म्हणत असतील.
मोपलवारांच्या भ्रष्टाचाराचे चारित्र्य हीनतेचे असंख्य पुरावे मी प्रत्यक्ष भेटून तुम्हाला दिले होते. तुम्ही प्राथमिक चौकशी केली. अन्य कोणाशी नव्हे तर आपण माझ्याशी प्रत्यक्षपणे बोललात की, सेंट्रल व्हीजीलन्स कमीशन, ई. डी., इंकमटॅक्स, सी. बी.आय. इत्यादी
केंद्रीय यंत्रणांकडे आपण केलेल्या तक्रारीची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. काय केले तुम्ही त्यांचे ? जॉनी जोसेफ सारख्या सेवानिवृत्त सचिवांची चौकशी समिती नेमून ‘रेवडी वाल्याने, गंडेरी वाल्याला, साक्ष दिली’. आपली स्मरणशक्ती फार दांडगी आहे. आपणास स्मरत असेल. की, नागपूर अधिवेशन काळात मोपलवारांच्या संदर्भात मी आपणास भेटलो काय
म्हणालात आपण ? आपले म्हणणे अजिबात खोटे नाही, पण समृध्दी मार्गाचे काम पूर्ण करण्याकरिता. मी मोपलवारांना पुन्हा घेणार आहे. या प्रकरणात मी तुमचे एकणार नाही. मी म्हणालो, आपण मुख्यमंत्री आहात, आपणास निर्णय घेण्याचे स्वांत्र्य आहे.
मी आपल्या कार्यालयाच्या बाहेर पडलो. तुम्ही काय मोपलवारांची नियुक्ती चिंचोक्यांच्या बदल्यात केली का ? मी स्वत: तुम्हाला पत्र लिहून जॉनी जोसेफ आणि मोपलवारांच्या संदर्भात कल्पना दिली. दुसर्या कुठल्याही अधिकार्याची नियुक्ती करावी अशी विनंती केली. पण आपणाला ‘समृध्दी खुणावत होती. मोपलवारांच्या भ्रष्टाचाराचा व्हिसल ब्लोअर मांगले व त्याच्या पत्नीला पाच
कोटीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात गुंतवून याच परमवीर सींगांच्या मदतीने तुम्ही मोक्का लावला.
गेल्या चार पाच वर्षापेक्षा जास्त आपल्या चार पाच वर्षांच्या मुलांना वाऱ्यावर सोडून अजूनही आपण त्यांना तुरुंगात सडबत आहात. मोक्का कायद्याच्या कलम २ डी प्रमाणे अशा पध्दतीच्या दोन गुन्ह्यांची कोर्टाने दखल घेतली असेल तरच त्याला मोक्का लागु शकतो. तुम्हाला न्याय व्यवस्थेची थोडी जरी असती तरी लहान बालकांचे शिव्याशाप सहन करुन मोपलवारांसारख्या
भ्रष्ट आणि स्त्रिलंपट अधिका-्याला पाठीशी घातले नसते. ‘समान शिले समान व्यसने सुसंख्यम’ म्हणूनच तुम्हाला फडणवीसांना गिरीष महाजन, जयकुमार रावल, मोपलवार अशांची संगत प्रीय वाटत असावी.
देवेंद्र फडणवीसांना मी चांगला ओळखून आहे. ज्या विजय पुराणीकांची संघटनमंत्री पदावरून मुक्तता करण्यात आली. स्वत: आणि तुम्ही मला घेऊन ‘वर्षा’ बंगल्यावर बसले हाते. रात्री दहा ते दोन पाऊणे दोन वाजेपर्यंत चर्चा केली. पद मागीतले नव्हते ?
सवलत मागीतली नव्हती ? कृपादृष्टीची अपेक्षाही केली नव्हती. फक्त धुळे माझा मतदार संघ असल्यामुळे या मतदार संघातील पालिकेची निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढवीली जावी एवढीच अपेक्षा व्यक्त केली होती. तुम्ही कबुलही केले. दुसऱ्या दिवशीच्या पत्रकार परिषदेतही सांगीतले. २४ तास उलटत नाही. तो तुम्ही पलटी मारली. मी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला.
मागीतलेले चिन्ह मिळू नये. यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला. धुळे शहरातील ३२ नामचीन गुडांना पक्षात घेतले. त्यांना तिकीटही दिली. सत्तेत बसवले. आज धुळे शहराची अक्षरश: वाट लागलेली आहे.
असे एक काम नाही ज्या कामात किमान ५०% भ्रष्टाचार नाही. मतदान यंत्रांमध्ये हेराफेरी केली. ज्यांना गल्लीतली चार घरे ओळखत नाही. अशा टाकाऊ नगरसेवक केले आणि तुमच्या, तुम्ही सोडलेला गिरीष महाजन, धुळ्याचा जयकुमार यांच्या अहंकारामुळे आणि केवळ मी आपल्या भ्रष्टाचारात टोळीत सहभागी होत नाही. म्हणून किंवा तुमच्या ‘वर्षा नाईट क्लब’चा सभासद झालो नाही. म्हणून या आकसापोटी माझ्या धुळे शहराचा सत्यानाश करुन ठेवला. कुठल्याही पोलीस बंदोबस्ताशिवाय, संरक्षणाशिवाय पुढच्या निवडणुकीच्या प्रचाराला तुम्ही धुळ्यात या ! धुळ्यातील माता-भगिनी तुमची फार आतुरतेने वाट पाहत आहेत.
फडणवीस इतक्या कोत्या मनोवृत्तीचे आणि हलकट आहेत की, धुळे शहरातील जटील झालेला वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याकरीता ११ किलोमिटर लांबीच्या रस्त्यांना नगरविकास विभाग कडून ७५ कोटी मंजूर केले. ३० कोटी एकदा प्रारंभाला मग १०१० कोटी असे ५० कोटी दिले आणि उर्वरीत २५ कोटी देऊ नका. अशा सुचना नगरविकास विभागांना दिल्या. माझे काम अंदाजपत्रकापेक्षा १२.५० % कमी दराने केले. सरकारचे साडे आठ कोटी रुपये वाचवले. असंख्य प्रलोभने झुगारुन आपल्या प्रामाणीकपणाला कलंक लागू नये, या उद्देशाने करुन घेतले. पण त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यातील ताईत असलेल्या चिकना फद्या जयकुमार रावल यांनी बुराई नदीवरील दिलेल्या बंधाऱ्याचे काम अंदाजपत्रकापेक्षा ३० % ज्यादा दराने दिले आहे. माझ्या गांधीवादी वडीलांचे संस्कार त्यामुळे या गोष्टी मनाला पटत नव्हत्या. आता मला कळाले. तुमच्या दरबारातील नवरत्नांच्या रांगेत मी बसतच नव्हतो. मला काय माहीत की मंजुर केलेल्या निधीमध्ये मंजूर करणा-या मंत्र्यांचा ५-१० % हिस्सा असतो. कशाला उगाच आकंड तांडव करतात. मी तो अनिल गोटे नाही. की महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याविरुध्द आघाडी उघडण्यासाठी कशाचाही विचार करणार नाही.
प्रत्येक वेळेला सुशांतसिंग राजपूत, कंगना रणावत, अर्णव गोस्वामी आता वाझे प्रकरण उपस्थित करायच प्रसिध्दी माध्यमांच्या मागण्यांची पुर्तता करायची आणि महाराष्ट्रातील गारपीट, अवकाळी पाऊस, शेतीमालाचे भाव, कांद्याचा प्रश्न, दिवसागणीक वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, बेरोजगारी, करोना इत्यादी प्रश्नांवर जो अक्रस्ताळेपणा आवश्यक आहे. तो करत नाही. फक्त मुख्यमंत्री पदावर डोळा ठेवून आपल्या पाच वर्षाच्या कालावधीतील भानगडी उघड या होता कामा नये. हा हेतू मनात ठेऊन रोज उठून खोटे बोला पण रेटून बोला या तुमच्या नेत्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून फक्त खोटेच बोलत आहात. स्वत:च्या अंतमनाला प्रश्न विचारा की परमवीर सिंगांना मदत करुन आपण आपल्या कृतीतून सचीन वाझेसारख्या खाकी गणवेशातील अपराध्याला पाठीशी घालण्याचे दुश्य कृत्य करीत आहोत. याची थोडी तरी वाटू द्या.
आपला
अनिल गोटे Anil Gote
प्रदेश उपाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य,
तथा प्रभारी – धुळे व नंदुरबार, जिल्हा,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.