माध्यमिक विद्यालय बनले दारूचा अड्डा !

पाचोरा प्रतिनिधी । कोरोनामुळे शाळा बंद असल्याचा गैरफायदा घेत विद्यालयाच्या आवारात दारूड्यांनी Liquor Bottles In School Premises अड्डा तयार केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील माध्यमीक विद्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विद्यालयाच्या परिसरात दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. हे तिसरे नेत्र माणसाजवळ नसले तर तो मरे पर्यंत त्या वाचून आधंळा राहतो. ज्यांनी त्या शाळेत शिक्षण घेतले त्यांनीच काही उपद्व्याप करून शिक्षणाचे मंदिर समजल्या जाणार्‍या शाळेत अवैध दारू पिऊन धिंगाणा घातला व शाळेची किरकोळ नुकसान केल्याचे समोर आले आहे. Liquor Bottles In School Premises

ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी शिक्षकांसमवेत पाहणी केली तर शाळेच्या आवारात जिकडे -तिकडे दारूच्या बाटल्या, बियरच्या बाटल्या, प्लास्टीक ग्लास, पाणी बाटल असे मोठ्या प्रमाणावर आढळून आले. यावेळी सरपंच पती गणेश संतोष पाटील, उपसरपंच शालिग्राम बाजीराव पाटील, सदस्य योगेश शांताराम पाटील, नगराज पाटील, पंढरीनाथ पाटील यांच्या समवेत माध्यमिक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. यामुळे गावातून नाराजी व्यक्त करण्यात येत असून यापुढे तेथे कोणी असे गैरकृत्य करतांना आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ही यावेळी उपस्थितांनी सांगितले आहे.

Protected Content