यावल प्रतिनिधी । अनिल चौधरी हे अपक्ष उमेदवार असून त्यांचा भाजपशी संबंध नसल्याची स्पष्टोक्ती जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी दिली. मतदार हरीभाऊ जावळे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
रावेर-यावल मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनिल चौधरी हे आपण भाजपचे पदाधिकारी असल्याची अफवा पसरवत असल्याच्या तक्रारी ना. गिरीश महाजन यांच्याकडे आलेल्या आहेत. या पार्श्वभूमिवर, यावल येथे पक्ष कार्यर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ना. गिरीश महाजन म्हणाले की, अनिल चौधरी हे भाजपे कार्यकर्ते, पदाधिकारी वा माझे समर्थक नसून ते अपक्ष उमेदवार आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार हे हरीभाऊ जावळे असून सर्व पदाधिकार्यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनदेखील ना. महाजन यांनी याप्रसंगी केले. दरम्यान, गिरीशभाऊंनी महायुतीचे उमेदवार हरीभाऊ जावळे यांच्यासाठी दोन्ही तालुक्यांमध्ये महत्वाच्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेऊन मोर्चेबांधणी केली.