जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आमोदा ते घार्डी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी वृध्देचा मृत्यु झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
वय ७० ते ७५ वर्ष अंगात स्वेटर, पांढरे केस असे मयत वृद्धेचे वर्णन आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर वृद्धेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी आमोदा येथील पोलीस पाटील राहुल पाटील यांच्या खबरीवरुन तालुका पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत वृद्धेची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे. वृद्धेच्या अोळख पटविणे कामी कुणाला काहीही माहिती मिळाल्यास विश्वनाथ गायकवाड मोबाईल क्रमांक ९५९४९४१६१५ यांना संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.