यावल आदीवासी संघटनेच्या बेमुदत धरणे आंदोलनाचा समारोप

यावल प्रतिनिधी | विविध प्रलंबित मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर आदीवासी एकता परिषद भारत या संघटनेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा मागण्या मान्य केल्याच्या लिखित आश्वासनानंतर समारोप करण्यात आला.

येथील तहसील कार्यालयासमोर आदीवासी समाज बांधवांच्या साकळी, वाघोदा, चिखली, सांगवी, भालोद, यावल शहर गोळीबार टेकळी, बोरखेडा खु, दगडी इतर ठिकाणच्या आदिवासी बांधवांना नवीन शिधापत्रिका मिळावी, किनगाव येथे आदीवासी भिल, बारेला या कुटुंबाच्या राहत्या घरांची अतिक्रमित जागा नांवे लावण्यात यावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदीवासी एकता परिषद भारत या संघटनेच्या माध्यमातून काल दिनांक १५ डिसेंबरपासून बेमुदत धरणे सुरु करण्यात आले होते.

संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या मागण्या मान्य केल्याच्या तहसीलदार महेश पवार यांनी दिलेल्या लिखित आश्वासनानंतर या धरणे आंदोलनाची सांगता झाली. या दोलनात भिका कदम, सदू बोरसे, देविदास मोरे, अशोक पठाण, प्रकाश सोनवणे, दगडू भिल, संतोष भिल, प्रेमलाल बारेला, यशवंत अहिरे यांनी या धरणे आंदोलनात सहभाग घेतला .

Protected Content