रावेर प्रतिनिधी । रावेर पोलिस स्टेशन हद्दीतील तापी नदीकाठी अनोळखी मृतदेह आढळून आला असून ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
याबाबत आधिक माहिती अशी की, तापी नदीकाठी, नांदुपिंप्री तापी पुलाचे खाली धुरखेडा गावचे शिवारात एक 30 ते 35 वयोगटातील तरुणाचा मृतदेह नदीपात्रात सुमारे 2 ते 3 दिवसापूर्वीचे मिळून आले असून धुरखेडा पोलीस पाटील यांचे फिर्याद वरून कलम-174 crpc प्रमाणे दाखल असून रंग सावळा ,केस काळे,चेहरा गोलसर, बांध मजबूत, उंची सुमारे 165 से मी, उजवे हाताचे मनगटावर इंग्रजी S M गोंदलेले, निळसर जीन्स फुलपॅन्ट, व निळ्या रंगाचे फुलबायाचे पांढरे, लालसर बारीक चौकडी शर्ट, दोन चाबी असलेले किचन त्यावर wonder, व दुसरे बाजूस VIHAN FUIION असे लिहलेले लॉकेट सह चाबी असे वर्णन असलेले अनोळखी मृतदेह मिळून आला आहे.
पो नि रामदास वाकोडे ,व PSI मनोहर जाधव यांनी8 भेट दिली असून ,प्रेत कुजलेले,फुगलेले आहे,पुढील तपास PSI जाधव करीत आहेत,नातेवाईकांनी तात्काळ रावेर पोलिसांशी मोबाईल क्र9049822516 PSI जाधव या मोबाईल वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.