जळगावातील वाईन शॉप्स व एजन्सीजची मॅरेथॉन चौकशी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नीलम वाईन्ससह अन्य दारू विक्रीची दुकाने आणि एजन्सीजवर आज तपासणी करण्यात आली असून रात्री उशीरापर्यंत पथकातर्फे चौकशी सुरूच होती.

आज सकाळी अकराच्या सुमारास शहरातील नीलम वाईन्ससह अन्य काही दारू विक्रीच्या दुकानांची आकस्मीक तपासणी करण्यात आली. यात शहरातील नीलम वाईन्ससह राज वाईन्स, विजय वाईन्स, विनोद वाईन्स, सोनी ट्रेडर्स-नशिराबाद याां समावेश होता. यात बांभोरी जवळील विनोद वाईन एजन्सीज च्या गोदामात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अध्यक्ष नितीन धार्निक यांच्या मार्गदर्शनाखाली मद्याच्या साठ्याची पाहणी करण्यात आली. सकाळी ११ वाजेपासून रात्रीच्या तब्बल सव्वाआठ प्रयन्त विविध प्रकारच्या ब्रँडची तपासणी झाली..रेकॉर्डप्रमाणे साठा आहे की नाही याची तपासणी करताना चार – पाच खोके कमी आढळून आले, अशी माहिती निरीक्षक जे.एस.जाखळे यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. साठ्याची तपासणी दुय्यम निरीक्षक श्री.बुआ , दुय्यम निरीक्षक श्री.नाईक आणि सहकारी वाणी , जोशी , हंडोरे , पाटील आदींनी केली. शहरातील इतर वाईन हाऊसचीही तपासणी झाली. यातील तपशीर समोर आला नसला तरी काही वाईन हाऊस राजकीय पदाधिकार्‍यांचे असल्याने एकच खळबळ माजली होती. दरम्यान आज शहरात याबाबत उलट सुलट चर्चेला उत आला होता.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content