भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वराडसीम गावात पती पत्नीचे सुरू असलेले भांडण सोडविण्याच्या आलेल्या एका वृध्दाला एकाने दारूच्या नशेत लाकडी काठीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक तोताराम सपकाळे वय ६४ रा. वराडसीम ता.भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता गावात राहणारे देविदास जाधव आणि त्यांची पत्नी जयश्री जाधव यांचे भांडण सुरू होते. त्यावेळी अशोक सपकाळे हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्याठिकाणी गावात राहणारा सुनिल प्रताप पाटील रा.वराडसीम ता.भुसावळ याने अशोक सपकाळे यांना शिवीगाळ करत लाकडी काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी अशोक सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनिल प्रताप पाटील याच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार युनूस शेख हे करीत आहे.