‘या’ पक्षाने सोडली ठाकरे गटाची साथ; स्वबळावर लढणार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना ठाकरे गटासोबत असलेल्या संभाजी बिग्रेड या पक्षाने विधानसभेला एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेसोबतची युती तोडणार आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे याने पत्रकार परिषदेतून आपली भूमिका मांडणार आहे. तसेच त्यांनी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का लागेल.

शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये काही जागांवरुन वाद सुरू आहेत. अनेक बैठका होऊन देखील यावर तोडगा निघालेला नाही. त्यातच ठाकरेंसोबत युती असलेल्या संभाजी ब्रिगेडने देखील ५० जागांची मागणी केली आहे. मात्र, या जागांबाबत संभाजी ब्रिगेडसोबत चर्चा किंवा जागा दिल्या जात नसल्याने नाराजी दर्शवत ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय संभाजी ब्रिगेडने घेतला आहे.

दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. संभाजी ब्रिगेड मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून कोणाला उमेदवार म्हणून जाहीर केले जाईल हे पाहावे लागणार आहे.

Protected Content