धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील धार शिवारातील शेट गट क्रमांक २७६ मध्ये ट्रॅक्टरने नांगरटी करण्याच्या विरोधात करत एका वृध्दाला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिपक अनंत अट्रावलकर वय ६१ रा. शाहू नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याचे धरणगाव तालुक्यातील धार शिवारातील शेत गट क्रमांक २७६ मध्ये शेत आहे. १३ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दिपक अट्रावलकर हे त्यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरटी करत असतांना त्याठिकणी लखिचंद भगवान पाचपोळ, सौरभ लखिचंद पाचपोळ आणि इतर दोन अनोळखी सर्व रा. धार ता.धरणगाव यांनी दिपक अट्रावलकर यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. यात दिपक अट्रावलकर हे जखमी झाले आहे. याप्रकरणी रविवारी १७ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन हे करीत आहे.