कोंबिंग ऑपरेशनमध्ये गावठी कट्टयासह दोघांना अटक

भुसावळ प्रतिनिधी । पोलिसांच्या कोंबींग ऑपरेशनमध्ये गावठी कट्टा बाळगणार्‍यांना आज पहाटे चार वाजता अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, आज पहाटे पोलिसांतर्फे परिसरात कोंबींग ऑपरेशन करण्यात आले. यात शिरपूर कन्हाळा रोड वरील घोडेपीर बाबा दर्गा जवळ एका लाल रंगाची कार क्र एम एच ४३ एन ६३५० मधील इसमाच्या कबज्यात गैरकायदा गावठी कट्टा असल्याची गुप्त बातमी उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड यांना मिळाली होती. यानुसार पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सपोनि संदीप परदेशी, अनिल मोरे, तस्लिम पठाण, सुनील जोशी, रविंद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, उमाकांत पाटील, तुषार पाटील, नेव्हिल बाटली, विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, इश्‍वर भालेराव व प्रशांत परदेशी यांच्या पथकाने या कारमधील दोघांना ताब्यात घेतली. विचारपूस केली असता हे दोन्ही दीपक संजय चौधरी (वय-३५ रा.रामदेव बाबा मंदिरा जवळ भुसावळ ह मु लोणवाडी ता बोदवड) आणि कुंदन रामदास वानखेडे (वय-२५ रा.रामदेव बाबा मंदीर जवळ भुसावळ) असल्याचे सांगण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता असता त्यांयाकडे गावठी कट्टा आढळून आला. यावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरूध्द भाग ६ गु.र.न ०८/२०२० आर्म अँक्ट ३/२५ तसेच मु पो ऍक्ट ३७ (१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content