Home क्राईम देवगाव येथे वृध्दाचा विहीरीत पडून मृत्यू

देवगाव येथे वृध्दाचा विहीरीत पडून मृत्यू


चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील ओढरे रोडवरील शेतातील विहिरीत पडून वृध्द व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

सविस्तर वृत्त असे की, मयत ईश्वर राजधर पाटील (वय- ६५ रा. देवगाव) ता. पारोळा जि. जळगाव येथे वास्तव्यास आहेत. वैयक्तिक कामानिमित्त आलेले असताना गणेशपूर ओढरे रोडवरील दशरथ चिंधा पाटील यांचे शेतातील विहिरीच्या पाण्यात बुडून ईश्वर पाटील याचा मृत्यू झाला. हि घटना २३ मार्च रोजी सायंकाळी ७:३० सुमारास उघडकीला आली. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत गणेशपूर येथील पोलिस पाटील भागवत सुर्यवंशी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोना दिपक ठाकूर हे करीत आहेत.


Previous articleभाई जगताप भाजपवर खवळले
Next articleएन.व्ही रमण होणार सरन्यायाधीश
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound