के.सी.पार्क येथे अपघातात वृध्दाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कानळदा रोडवरील के.सी.पार्क येथे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या ६७ वर्षीय वृध्दाचा उपचारादरम्यान गुरूवारी ३० नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. देविदास बापुजी सौदे वय-६७ रा. के.सी.पार्क, जळगाव असे मयत वृध्दाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील कानळदार रोडवरील के.सी.पार्क परिसरात देवीदास सौदे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरूवारी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी कानळदा रोडवरून पायी जात होते. त्यावेळी एका अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैदयकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रात्री ८ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक ललीत भदाणे करीत आहे.

Protected Content