बंद घर फोडून मुद्देमाल लांबविणाऱ्या दोघांना गडचिरोली जिल्ह्यातून अटक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील नहाटा चौफुली परिसरातील बंद घर फोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख १० हजारांचा मुद्देमाल लांबविला होता. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपीला भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथून अटक केली आहे.  व्यंकटी रामा गोडमारे (वय-३८) आणि हितेश देवीदास ठेंगरी (वय-२८) दोन्ही रा. देसाईगंज जि. गडचिरोली असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

भुसावळातील नहाटा चौफुलीजवळ राहणारे शिवदास दौलत पाटील यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातून रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख १० हजारांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी हे गडचिरोली येथे असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार पथक गडचिरोलीला रवाना झाले. दरम्या गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज गावात सापडा रचून संशयित आरोपी व्यंकटी रामा गोडमारे (वय-३८) आणि हितेश देवीदास ठेंगरी (वय-२८) दोन्ही रा. देसाईगंज जि. गडचिरोली यांना अटक केली. दोघांकडून चोरीतील ६८ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.  पुढील तपास उमाकांत पाटील करीत आहे

Protected Content