Home प्रशासन वरणगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरसे यांना निरोप

वरणगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरसे यांना निरोप

0
102

 

 

वरणगाव प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरसे यांची आज बदली झाली. त्यानिमित्त वरणगाव येथील पोलीस हॉलमध्ये निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी संदीप बोरसे यांचा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सत्कार केला.

वरणगाव शहरालगत 27 खेडयांचा कारभार पोलीस स्टेशन आहे याठिकाणी संदीप कुमार बोरसे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरती होते त्यांची बदली झाली आहे ,त्यांच्या ठिकाणी नाशिक ग्रामीण येथून आशिष अडसूळ यांची नेमणूक करण्यात आली आहे ,आज संदीप कुमार बोरसे यांचा निरोप समारंभ चा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी शहरातील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व विविध पक्षांच्या वतीने आणि सामाजिक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

 


Protected Content

Play sound