मंत्रीमंडळाची आज तातडीची बैठक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज ठाकरे सरकारची तातडीची कॅबिनेट अर्थात मंत्रीमंडळाची  बैठक होणार असून यात महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

साधारणपणे बुधवारी कॅबिनेट बैठकीचे आयोजन करण्यात येते. काही तातडीच्या वेळेस मात्र केव्हाही मंत्रीमंडळीची बैठक घेण्यात येत असते. या अनुषंगाने आज सायंकाळी पाच वाजता मंत्रीमंडळाची बैठक घेण्यात येणार आहे. यात शिवसेनेचे उर्वरित मंत्री तसेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मंत्री सहभागी होणार आहेत.

या मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही तरी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. यात राज्यातील सध्याच्या स्थितीवर चर्चा करण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. यात प्रामुख्याने या स्थितीवर नेमकी कशी मात करावी ? यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर उध्दव ठाकरे हे राजीनामा देण्याची शक्यता देखील आहे. असे झाल्यास राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अर्थात, याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. यामुळे या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Protected Content