ब्रेकींग : अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका करणारी कविता शेअर केल्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर अभिनेत्री केतली चितळे हिला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

या संदर्भातील वृत्त असे की, केतकी चितळे ही अभिनेत्री   राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांच्यावरील अतिशय खालच्या स्तरावरच्या टिकेने चर्चेत आली आहे. फेसबुकवर अभिनेत्री केतकी चितळे हीनं पवार साहेबांच्या आजाराचा संदर्भ घेऊन टीका केली आहे. वकील नितीन भावे यांनी लिहलेली कविता तिने आपल्या फेसबुक पेजवरून शेअर केली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

 

अभिनेत्री केतकी चितळे हीनं नितीन भावे यांची कविता शेअर केली असून यात अतिशय आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला आहे. तिने आपल्या फेसबुक पेजवरून कॉमेंट ऑफ केल्या असल्या तरी हा संदर्भ घेऊन फेसबुकसह अन्य माध्यमांवरून तिला तुफान ट्रोल केले जात आहे.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी जवाहर राठोड यांची ‘डोंगराचे ढोल’ या संग्रहातील ‘पाथरवट’ ही कविता लोकांसमोर सादर केली होती. त्याचा संदर्भ केतकीच्या पोस्टला आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या पोस्टनंतर तिच्यावर कळवा पोलीस स्थानका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर दुपारी ठाणे पोलिसांनी दुपारी केतली चितळे हिला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!