समता नगरात भरधाव रिक्षाच्या धडकेत पायी जाणाऱ्या वृध्द महिला गंभीर जखमी

अज्ञात रिक्षाचालकावर रामानंदनगर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । इस्त्री करण्यासाठी लागणारे कपडे घेण्यासाठी पायी जाणाऱ्या ८० वर्षीय वृध्द महिलेला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने जोरदार धडक दिली. यात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर असे की, समता नगरातील हमाल नगरात राहणाऱ्या गंगूबाई जयसिंग जाधव (वय-८०) ह्या आपल्या कुटुंबियांसह राहतात. बुधवारी १२ मे रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास वृध्द महिला इस्त्री करण्यासाठी लागणारे कपडे घेण्यासाठी घराबाहेर पडल्या. समता नगरातील गुरूकृपा डेअरी जवळून जात असतांना समोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या रिक्षा (क्रमांक एमएच १९ व्ही ७१८) ने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून हा फॅक्चर झाला आहे. अपघात होताच रिक्षाचालक रिक्षा घेवून पसार झाला आहे. आजूबाजूच्या नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले. गंगूबाई जाधव यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण जगदाळे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.