आघाडीबाबत काँग्रेसकडून संभ्रमाचे वातावरण; वंचित बहूजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांचा आरोप (व्हिडिओ)

जळगाव सचिन गोसावी । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकीकडे स्वबळाचा नारा देतात, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची भाषा करतात. यामुळे ते आघाडीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण करत असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीतर्फे आज बुधवारी सायंकाळी शिरसोली रोड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी केला आहे.

जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आकोला भेटी दरम्यान वंचित बहूजन आघाडीला सोबत घेवून निवडणूक लढू असे सांगितले होते. दरम्यान यापुर्वी देखील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतू काहीच निष्पन्न झाले नाही. दिवंगत विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या रिक्त जागेवर ॲड. प्रकाश आंबेडकरांना मंत्री मंडळात जागा देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिल्ली पाठविला होता तेथूनही नाकारात्मक प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आमच्या सोबत युती करू पाहत आहे. तर दुसरीकडे कॉग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे वक्तव्य करतात. दरम्यान, युती संदर्भात नाना पटोले यांनी दिल्ली येथून परवानगी घेतली आहे का याची खातरजमा करून घ्यावी असा सवाल वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत यांनी दिला. याप्रसंगी विनोद सोनवणे, महानगरप्रमुख दिपक राठोड, महानगर सचिव डॉ नारायण अटकोळे, महानगर जिल्हा उपाध्यक्ष मनोज अडकमोल आणि जितेंद्र केदार आदी उपस्थित होते.

Protected Content