सुप्रीम कॉलनी परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी येथून हातमजुरी करणाऱ्या व्यवसायिकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून येण्याची घटना मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सांकाळी सात वाजता घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गजानन सुखदेव जाधव (वय-५४) रा. कुसुंबा ता.जि. जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता गजानन सुखदेव जाधव हे त्यांचे दुचाकी (एमएच १९ डीवाय ९४६५)ने जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी येथील रिक्षास्टॉप जवळ आले होते. त्यावेळी त्यांनी नाश्त्याच्या गाडी जवळ जाऊन नाष्टा केला. दरम्यान त्यांनी पार्किंगला लावलेली ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेण्याचे समोर आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु दुचाकी त्यांना कुठेही मिळून आले नाही. अखेर शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील करीत आहे.

Protected Content