जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील लक्ष्मी नगरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्ती रोड अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना सोमवार १२ मे रोजी पहाटे ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाजी लोभाजी तडवी वय ४५ रा. लक्ष्मी नगर, जळगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील लक्ष्मी नगर परिसरात शिवाजी तडवी हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. ११ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शिवाजी तडवी हे रोड अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना सोमवार १२ मे रोजी पहाटे ३ वाजता मृत्यू झाला. दरम्यान या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ गफ्फुर तडवी हे करीत आहे.