जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी। जळगाव शहरातील शिरसोली रोडवरील इकरा युनानी कॉलेजजवळ दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या ३५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. विनोद गोविंदा हटकर (रा. ओम नगर, शिरसोली, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद सोमवार १२ मे रोजी दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद हटकर हा शिरसोली येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होता. २ मे रोजी जळगावकडून शिरसोलीकडे येत असताना, इकरा युनानी कॉलेजजवळ त्यांची दुचाकी स्लिप झाली आणि ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल समाधान टहाकळे हे करीत आहे.