भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा जागीच मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रोडवरील ॲग्रो नर्सरी जवळ पायी जात असलेल्या ५५ वर्षीय प्रौढाला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर दयाराम चव्हाण वय ५५ रा. भोकर ता. जळगाव असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भोकर गावात किशोर चव्हाण हे वास्तव्याला होता. गुरूवार ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता ते चोपडा ते जळगाव रस्त्यावरील ॲग्रो नर्सरी जवळून पायी जात असतांना मागून येणाऱ्या दुचाकी क्रमांक (एमपी ६८ झेडबी ८७०४) या दुचाकीने किशोर चव्हाण यांना जोरदार धडक दिली. या अपघातात किशोर पाटील यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील मन्साराम प्रकाश बारेला हा जखमी झाला. दरम्यान, याप्रकरणी शुक्रवारी ५ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता दुचाकीधारक मन्साराम बारेला याच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण आगोणे हे करीत आहे.

Protected Content