भारतीय सैन्य दलातून अमोल यादव सेवानिवृत्त ; गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत (व्हिडीओ)

yav1

यावल प्रतिनिधी । येथील शिवाजीनगर मधील रहिवासी अमोल निळकंठ यादव हे आपल्या १८ वर्ष भारतीय सैन्यातील सेवेनंतर दि.३१ जुलै रोजी वरिष्ठ हवलदार या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी आज दि.2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बसस्थानकांवर आगमन होताच, ‘भारतमाता की जय’ च्या घोषाने संपुर्ण परिसर देशभक्तीमय झाले होते.

याबाबत माहिती अशी की, यादव हे सन २००० मध्ये भारतीय सैन्येत रुजु झाले होते, त्यांनी आपल्या १९ वर्षाच्या देशसेवेत त्यांनी जम्मु काश्मिर, लेह लद्दाख, अमृतसर, अंम्बाला, झांसी आदी ठिकाणी सेवा बजावली. यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील तसेच माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक प्रा. मुकेश येवले, महसुल प्रशासनाचे निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, एसटी आगाराचे प्रभारी व्यवस्थापक एस.व्ही. भालेराव, यांच्यासह विविध क्षेत्रातील सर्व जातीधर्मातील नागरीक पत्रकार अरूण पाटील, अय्युब पटेल, सुनिल गावडे, तेजस यावलकर, फिरोज पटेल, यांच्यासह परिसरातील सामाजीक कार्यकर्ते व समाज बांधव मान्यवरांच्या मोठया संख्येत उपस्थितीत सेवानिवृत सैनिक अमोल यादव यांचे शाल-श्रीफळ, पुष्पहार देवुन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीने शहरवासीयांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या स्वागताच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिवाजीनगर परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यानी महत्वाचे परिक्षम घेतले.

Protected Content