जळगाव पीपल्स बँकेतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ३ लाख ८६ हजार रुपयांची मदत

जळगाव, प्रतिनिधी । दि.जळगाव पीपल्स को-ऑप बँक लि. जळगावच्या वतीने कोरोनाग्रस्तांसाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोवीड-१९ करीता ३ लाख ८६ हजार १३० रुपयांचा मदत निधी देण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत विविध सामाजिक संस्था, व्यक्ती यांचेमार्फत कोव्हीड-१९ साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ६९ लाख ८६ हजार ६७४ रुपये तर पीएम केअर्समध्ये २ लाख ६५ हजार रुपयांचा निधी जमा केला आहे. दि. जळगाव पीपल्स को-ऑप बँक लि., जळगावकडून राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनाला प्रतिसाद व समाजाप्रती दाखविलेल्या दातृत्वाचे जिल्हा प्रशासनाने कौतुक केले आहे. त्याचबरोबर अन्य संस्थांनीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समाजाचे घटक म्हणून प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पीएम केअर्समध्ये मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

Protected Content