अमोल पाटलांचा पन्नास हजारपेक्षा जास्त मताधिक्यांनी दणदणीत विजय

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल पाटील यांना आधीच उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर शेवट्या टप्प्यात महाविकास आघाडीतील ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटली. आणि माजी पालकमंत्री सतीश पाटील यांना उमेदवारी दिली.

एरंडोल विधानसभा मतदार संघातून अमोल पाटील हे ५६ हजार ३३२ मतांच्या फरकाने विजयी झाले आहे. एकुण २२ फेऱ्यांमध्ये त्यांनी प्रत्येक फेरीमध्ये त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार माजी आमदार शिरीष चौधरी, महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सतीश पाटील यांच्यासह इतरांचा दणदणीत पराभव झाला आहे. यात प्रचाराच्या दरम्यान अमोल पाटील आणि सतीश पाटील यांच्याच जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यामध्ये अमोल पाटील हे ५६ हजार ३३२ मतांच्या फरकाने विजयी झाले आहे. यात त्यांना १ लाख १० हजार ८८ मते मिळवून ते विजयी झाले आहे. तर सतीश पाटील यांना ४४ हजार ७५६ मते मिळाली दरम्यान, अमोल पाटील यांचा विजय झाल्याने पक्ष कार्यालयासह ठिकठिकाण कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केल्याचे दिसून आले.

 

Protected Content