आ.संजय सावकारे यांचा विजयी चौकार; विरोधकांना चारली धुळ

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ विधानसभा मतदार संघातून भाजपाचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांची याचा मोठ्या फरकाने विजय झाल्याने कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात फटाके फोडून एकच जल्लोष केल्याचे पहायला मिळाले. यावेळी आमदार संजय सावकारे यांना ४६ हजार ९५५ मतांच्या फरकाने विजयी झाले असून त्यांना १ लाख ६ हजार ९६ मते मिळाली आहे. विरोधकांचा दणदणीत पराभव झाला असून त्यांना धुळ चारली आहे. सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याने कार्यकर्त्यांसह समर्थकांनी भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारांनी प्रचार फेऱ्या आणि कॉर्नर बैठका यांनाच प्राधान्य दिले. काँग्रेसचे डॉ. राजेश मानवतकर यांच्या साठी आ. एकनाथराव खडसे यांनी सभा घेतली. तर संतोष चौधरी यांनी देखील त्यांना पाठींबा दर्शविला. मंगळवारी १९ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले त्यात भुसावळ विधानसभा मतदार एकुण ५७.७५ टक्के इतके मतदान झाले आहे. शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून भुसावळ तहसील कार्यालयात मतमोजणी घेण्यात आली. यात २३ फेऱ्या घेण्यात आले. प्रत्येक फेरीत आमदार संजय सावकारे यांनी आघाडी घेतली होती. २३व्या फेरी अखेरीस विद्यमान आमदार संजय सावकारे हे ४६ हजार ९५५ मतांच्या फरकाने विजयी झाले असून त्यांना १ लाख ६ हजार ९६ मते मिळाली आहे. त्यांच्या विरोधात असलेले महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजेश मानवतकर यांना ५९ हजार १४१ मते मिळाली आहे. तसेच अपक्ष उमेदवार स्वाती जंगले यांना ९ हजार ६६४ मते तर वंचितचे जगन सोनवणे यांना ३ हजार ६६३ मते मिळाली आहे. दरम्यान आमदार संजय सावकारे हे सलग चौथ्यांदा आमदार झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांस समर्थकांनी फटाके फोडून मोठा जल्लोष केल्याचे पहायला मिळाले.

Protected Content