कुणीही असो….त्या ट्विटसची चौकशी झालीच पाहिजे : आ. मिटकरी

मुंबई प्रतिनिधी । भारतरत्नांनी पदाला साजेसं असंच बोलावं वागावं व लिहाव असा सल्ला देत, तेंडुलकर असो की मंगेशकर सेलिब्रिटींच्या आक्षेपार्ह ट्विटसची चौकशी व्हायलाच पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी amol mkitkari यांनी केली आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

सेलिब्रीटींच्या एकसमान ट्विटचा मुद्दा आता चांगलाच ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख anil deshmukh यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याचा इशारा दिल्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं आहे.

याच मुद्यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हल्लाबोल केला आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे. मग मंगेशकर असोत की तेंडुलकर! ङ्गभारतरत्नांनीफ पदाला साजेसं असंच बोलावं वागावं व लिहावं. फडणवीसांनी भारतरत्नांची बाजू घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर,डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श परिपाठ सुद्धा वाचून घ्यावा, असा हल्लाबोल अमोल मिटकरी यांनी केला.

Protected Content