अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मांडळ शिवारात आज सायंकाळी झालेल्या वीज तांडवात तरूण ठार झाला असून त्याच्या कुटुंबातील चौघे सदस्य जखमी झाले आहेत.
तालुक्यातील मांडळ येथे आज सायंकाळी झालेल्या परतीच्या पावसामुळे वीज पडून एक जण ठार तर चौघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज दुपारी चार वाजेच्या सुमारास अमळनेर सह तालुक्यात परतीचा पावसाने हजेरी लावली. यात काही ठिकाणी तुरळक तर कुठे मुसळधार पाऊस पडला.
दरम्यान, मांडळ येथे विजांचा कडकडासह मुसळधार पाऊस झाला.याच दरम्यान शेतात काम करणारे आंनदा सुरेश कोळी (वय ३५) यांच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले; तर त्यांच्या च परिवारातील दोन महिला व दोन मुलं अशी चार जण देखील जखमी झाले आहेत. जखमी मध्ये त्यांची पत्नी प्रतिभा कोळी मुलगा प्रशांत कोळी,राज कोळी व सासू लटकन कोळी यांचा समावेश आहे.विजांचा कडकडाट होत असताना ते आश्रयासाठी झाडाजवळ गेले होते तेंव्हा ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. तर, जखमींना तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.