ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याच्या निर्णयावर अमळनेर समता परिषदेतर्फे जल्लोष

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याच्या निर्णयावर अमळनेर येथे समता परिषदेतर्फे जल्लोष करण्यात आला.

ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित केल्यानंतर आरक्षण वाचविण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील राज्यभर आंदोलन सुरु होते. ते सुरु असतांना राज्य सरकारला बांठिया आयोग स्थापन करायला भाग पाडून सर्वोच्च न्यायालयात उत्तम बाजू मांडणारे विधितज्ञ नेमण्यात आग्रही राहून आरक्षण वाचविण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न झालेत.

अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे २७% राजकीय आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय दिल्याने अमळनेर अ.भा महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आतिषबाजी करीत घोषणा देत जल्लोष करण्यात आला.

यावेळी समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. भीमराव महाजन, ता.अध्यक्ष अमोल माळी, शहराध्यक्ष प्रताप पाटील, माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष महेंद्र महाजन, नगरसेवक देविदास महाजन, प्रा. नितीन चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन, नगरसेवक प्रविण पाठक, माजी नगरसेवक ॲड सुरेश सोनवणे, मा.नगरसेवक विक्रांत पाटील, माळी समाजाचे माजी अध्यक्ष गंगाराम महाजन, ॲड सुदाम महाजन, राजेंद्र महाजन, गुलाब महाजन, साखरलाल महाजन, शिक्षक संघटनेचे तुषार पाटील, अनिल पाटील, नरेश महाजन, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सुनिल शिंपी, जाकीर मेवाती, चेतन महाजन, दीपक महाजन, हरीष चौधरी आदि यावेळी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.