झोका खेळताना मुलाचा करूण मृत्यू

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातल्या मुंदडा नगर भागातील एका पंधरा वर्षाच्या मुलाचा झोका खेळत असताना गळ्याला गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, शहरातील वेदांत संदीप पाटील(वय १५ वर्ष) हा विद्यार्थी रविवारी आपल्या घरी झोका खेळत अभ्यास करत होता. यावेळी झोका गरगर फिरून त्याची मान त्यात अडकली. यात त्याचा करूण अंत झाला.

या दुर्दैवी घटनेत मयत झालेला वेदांत संदीप पाटील(वय १५ वर्ष) हा इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वेदांत हा सुशिक्षित कुटुंबातील असून त्याचे आई वडील हे दोघेही शिक्षक आहे. मागील ३ महिन्या पूर्वी सोनी मराठी या मराठी वाहिनीवर प्रसारीत होणार्‍या कोण होणार मराठी करोडपतीया मध्ये त्या सहभागी झाल्या होत्या.त्या शिक्षिका जयश्री पाटील यांचा तो मुलगा आहे.
वेदांतच्या या ओढवलेल्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण अमळनेर तालुक्यात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: