मुडी येथील तलाठी कार्यालयाच्या कामास प्रारंभ

आमदार अनिल पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मुडी प्र.डा. येथे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून तलाठी कार्यालय साकारले जाणार असून या या कामास प्रारंभ झाला आहे.

मुडी येथील तलाठी कार्यालयासाठी आ.अनिल पाटील यांनी विशेष प्रयत्न करून सुमारे २७ लक्ष निधी आणला असुन सर्वसुविधायुक्त कार्यालय याठिकाणी निर्माण होणार आहे. या कामाचे भूमिपूजन सरपंच काशिनाथ महाजन, माजी प.स. सभापती चंद्रसेन सुरसेन पाटील,नाना पाटील,ग्रा.प. सदस्य दादा कौतिक पाटील,नारायण पाटील,नाना चौधरी,उदय सोनवणे ,भानुदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी किशोर पाटील, सुरेश पाटील, गुणवत पाटील, प्रदीप पाटील, रावसाहेब पाटील, बापु बडगुजर ,किशोर पाटील, वसंत पाटील,बापु पंडित पाटील, हेमंत पाटील, किशोर पारधी यांच्यां सह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वि का सोसायटी माजी चेअरमन गौरव उदय पाटील, प्रणव सुनील पाटील यांनी परिश्रम घेतले. मुडी गावासाठी तलाठी कार्यालयासाठी निधी मिळवल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार अनिल भाईदास पाटील यांचे आभार मानले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: