दहीगाव येथे औषधीच्या दुकानात चोरी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथील गावातील औषधीच्या दुकानातुन अज्ञात चोरट्यान्री शटर्स वाकवुन केली चोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यातीत दहिगाव येथील न्यू परिमल मेडिकल स्टोअर्स या दुकानाचे शटर्स अज्ञात चोरट्याने वाकवून दुकानातील दोन हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल सह 13800 रुपयाची रोकड लंपास केली आहे.

या संदर्भात महेंद्र रामचंद्र सोनवणे यांचे फिर्यादीवरून यावल येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि कलम४५७ , ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण व पोलीस करीत आहेत. यावल शहरात देखील नविन वसाहती मधील परिसरात चोरट्यांचे वावर वाढल्याचे बोलले जात असुन पोलीसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरीक करीत आहे.

Protected Content