मॉ तापी परिक्रमा पदयात्रेचे उदंड उत्साहात स्वागत

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मॉं तापी परिक्रमा यात्रेचे आज तालुक्यात मुंगसे येथे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले.

मॉ तापी संपूर्ण परिक्रमा पदयात्रा २०२३ वर्ष तिसरे पदयात्रेचेआज तालुक्यातील मुंगसे गांवात दुपारी अकरा वाजता आगमन झाले. या पदयात्रेचे मुंगसे येथील प्रकाश रामदास कोळी व संपूर्ण गावातर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सूर्यकन्या तापी मॉं प्रतिमेचे पूजन करून पदयात्रेतील सर्व भाविक भक्तांना व गावातील ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला !

मॉं तापी पदयात्रा ही मुलताई म.प्र . देशून २ जानेवारी २३ पासुन सुरुवांत झाली असून सुरत येथे १ फेब्रुवारी रोजी पोहचणार आहे. यानंतर उत्तर दिशेकडून मुलताई येथील मध्यप्रदेशात उगमस्थानावर दि.५मार्च २०२३ रोजी पोहचुन या पदयात्रेचा समारोप होणार आहे. अशा प्रकारे एकुण ६४ दिवसाचा प्रवास आहे.

दरम्यान, आज मुंगसे येथून रुंधाटी मठगव्हाण . जळोद मार्गे पुढील प्रवासासाठी दुपारी दोन वाजता प्रस्थान झाले. संध्याकाळी हिंगोणा येथे मुक्कामी राहणार असून १९ तारखेला गुरुवारी बोहरा येथे त्यांचे दुपारचे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे .मुंगसे येथे या पदयात्रेसाठी स्वामी भक्तानंद गुरुदेवानंद प्रतिष्ठाण निमगव्हाण येथील ट्रस्टी व संचालक मंडळ परीसरातील तांदळवाडी . सावखेडा, पातोंडा, रूंधाटी, मठगव्हाण आदी गावातील भावीक भक्तांनी सुर्य कन्या तापी माई प्रतिमेचे दर्शन घेऊन पुजा-अर्चा करून महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी विविध घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

Protected Content