अमळनेर (प्रतिनिधी) । येथील नव्याने उभारण्यात आलेल्या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 2 वर खासदार ए.टी. पाटील यांच्या मागणीवरून थंड पाण्याच्या केंद्राचे रविवार 24 रोजी उद्घाटन करण्यात आले. वाढत्या रेल्वे गाड्या, वाढती प्रवाशी संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने जनतेला स्वच्छ, सुसज्ज आणि मोठा असा प्लॅटफॉर्म नंबर 2 उभारला आहे, पण प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून खासदार ए. टी. पाटील यांनी या प्लॅटफॉर्मवर रेल्वेतर्फे थंड पाण्याचे मशीन बसविण्याची मागणी केली होती. त्याची रेल्वे प्रशासनाने दखल घेत आज असे मशीन कार्यान्वित केले आहे.
उद्घाटन प्रसंगी यांची होती उपस्थिती
यावेळी झेड.यु. आर.सी.सी. सदस्य बजरंग अग्रवाल, प्रीतपाल सिंग बग्गा, खासदारांचे स्वीय सहाय्यक झुलाल पाटील, अनिल वाणी, सी.एम. आय. किशोर कुमार नखाना, ए. डी. ई. एन. शुक्ला, स्टेशन मास्टर एस. के. रॉय, आय. डब्ल्यू. सिनियर सेक्शन इंजिनियर विजय शिरसाठ हे उपस्थित होते.