जळगावातील निमजाई फाऊंडेशनतर्फे परप्रांतीय मूर्तीकारांना किराणा साहित्यासह धान्य वाटप

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊनचे आदेश आहे. त्यामुळे हातावर पोट असणार्‍या हाताला काम नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. अशा पध्दतीने महामार्गालगत मूर्ती काम करणार्‍या परप्रांतिय मात्र जळगावातील निवासी तसेच झोपडपट्टीतील गरजू 90 ते 100 जणांना निमजाई फाऊंडेशनतर्फे किराणा साहित्यासह धान्य वाटप करण्यात आले.

शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात निमजाई फाउंडेशन गेल्या काही वर्षापासून कार्यरत आहे. लॉकडाऊनमध्ये गोरगरीबांना एक वेळचे जेवण मिळावे, उपासमारीची वेळ येवू नये या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून फाउंडेशनतर्फे गरजूंना किराणा तसेच धान्य वाटप करण्यात येत आहे. शहरात परप्रांतीय मूर्तीकार महामार्गालगत झोपड्यांमध्ये वास्तव्यास आहे. लॉकडाऊॅनमुळे त्याचेही हाताचे काम नसल्याने अशी कुटुंब अडचणीत होती. अशा कालिकामाता मंदिर पसिरातील मूर्तीकारांसह झोपड्यांमधील गरीब गरजू अशा 100 जणांना निमजाई फाउंडेशनतर्फे शासन आदेशानुसार सामाजिक अंतर ठेवत रविवारी गहू सोबत साखर, चहा, पावडर, बिस्किट पुडा, किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. अडचणीच्या काळात या मदतीमुळे कुटुंब भारावले होते. त्यांनी निमजाई फाउंडेशनत आभारही मानले.

कोरोनापासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन
वाटप करतवेळी निमजाई फाउंडेशनच्या अध्यक्ष शीतल पाटील (बाक्षे), सचिव भूषण बाक्षे, भगवान पाटील ,महेश पाटील विवेक जावळे, दीपक जावळे,कुणाल कोलते आदींची उपस्थिती होती. यावेळी शीतल पाटील (बाक्षे) यांनी वाटप झाल्यानंतर संबंधित कुटुंबियांना कोरोनापासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन केले. मास्क तसेच रुमाल वापरणे, वारंवार हात धुणे, यासह कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत माहिती दिली.

Protected Content