अमळनेर प्रतिनिधी । येथील नगरपालिकेतर्फे फलक काढण्यात येत असून यात दिक्षीर्थींचे बॅनर देखील काढल्याच्या निषेधार्थ रात्री रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, अमळनेर नगरपालिकेतर्फे काल सायंकाळी शहरातील विना परवाना लावलेले डिजीटल बॅनर काढण्यात आले. यात जैन समाजाच्या दिक्षार्थींचा फलक देखील काढण्यात आला. ही माहिती मिळताच समाजबांधवांनी मंगळवारी रात्री पाच पाऊली देवीजवळ रास्तारोको करुन पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. मुख्याधिकारी देशमुख यांच्या मार्गदर्शनात उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी ही कारवाई केल्याने त्यांचा आंदोलकांनी निषेध केला.
या प्रकरणी नगरपालिकेचे उप मुख्याधिकारी गायकवाड यांच्यावर कठोर करवाई करावी, अशी मागणी छोटू जैन, पंकज मुंदडा, महावीर पहाडे, कमल कोचर, भरत कोठारी, योगेश कोठारी, पूनम जैन, प्रसाद शर्मा, बजरंग अग्रवाल, निशांत अग्रवाल, प्रसन्न जैन, अॅड. सुशिल जैन आदींसह समाजबांधवांनी केली आहे.