अमळनेरात राष्ट्रवादीला जबर धक्का ; अनिल पाटील शिवसेनेकडून इच्छुक

anil bhaidas patil

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदार संघासाठी उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे राष्ट्रवादी बघत होती. तेच अनिल पाटील आता शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे वृत्ताने खळबळ उडाली आहे. या वृत्ताला शिवसेना जिल्हाप्रमुख व अमळनेर तालुकाप्रमुखांनी दुजोरा दिला आहे. यामुळे आजच्या घडीला अमळनेरात राष्ट्रवादीला जबर धक्का बसला आहे.

 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी राष्ट्रवादीचे अनिल पाटील हे शिवसेनेकडून इच्छुक असल्याचा दावा केल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. या संदर्भात अमळनेर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना सांगितले की, अनिल पाटील यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी झालेल्या भेटीत त्यांनी अमळनेर विधानसभा शिवसेनेकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार मी जिल्हाप्रमुख व संपर्क प्रमुख यांच्याशी त्यांची चर्चा करुवून दिली. त्यामुळे वरती आम्ही त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. जळगाव शहर मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे आम्ही अमळनेर विधानसभा मतदार संघ शिवसेनेला मिळावा, अशी आमची मागणी आहे.

 

 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, पाटील यांनी मुलाखत दिली नाही. परंतू त्यांचे नाव वरती पाठविले आहे. अनिल पाटील यांच्या भूमिकेमुळे मात्र, आजच्या घडीला राष्ट्रवादीकडे उमेदवारच नाहीय. माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केव्हाच भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे तत्कालीन जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांनी अनिल पाटील यांची सूचकरित्या उमेदवारी जाहीर केली होती. परंतू तेच अनिल पाटील आता शिवसेनेच्या संपर्कात असल्यामुळे राष्ट्रवादी समोर मोठा पेच उभा राहिला आहे. दरम्यान, लोकसभेला उमेदवारीचे कबूल करून ऐनवेळी नाकारल्यामुळे अनिल पाटील नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर आता एकप्रकारे शिक्कामोर्तब होत आहे. या संदर्भात अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

Protected Content