पाचोरा-भडगाव मतदार संघातील शिवसेना पदाधिका-यांचा मेळावा

parola bhadagaon

 

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एक मेळावा आज दुपारी शहरातील महालपुरे सभागृहात पार पडला. त्यावेळी गेल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदार संघात पुन्हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला.

अधिक माहिती अशा की, या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना संपर्क प्रमुख सुनील पाटील हे होते. या कार्यक्रमात आ.किशोर पाटील, गटनेत्या सुनीता पाटील, जिल्हाप्रमुख गणेश शिंदे, नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगध्यक्ष शरद पाटे हे उपस्थितीत होते. मतदारसंघ निवडणूक पक्षात संघटीत आणि मजबूत होण्यासाठी आ.किशोर पाटील यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षात सगळीकडे विकास कामे झाली आहे. काही मंजूर झालीत तर काही कामे होत आहेत. मतदारसंघात विकासाचा झंझावात झाला असून विकासाच्या जोरावर पाच वर्षात केलेल्या विकास कामाचे व्हिजन जनतेसमोर मांडण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच संपूर्ण मतदारसंघात १४१ गावात जाऊन जनअशीर्वाद यात्रा यशस्वी पार पडली आहे. पुन्हा मेळाव्यात आ. पाटील यांनी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला. मेळाव्याची सुरुवात करून प्रचारास सुरू केले आहे. कारण मतदारसंघ शिवसेनेकडून एकही उमेदवार इच्छुक नाही, म्हणून माझी उमेदवारी निश्चित आहे. युती झाली तर एकत्र प्रचार करूया, नाही झाली तर शिवसेनेचे आदेशाने प्रचार करणार. आणि पुन्हा मतदारसंघात विकास कामाच्या जोरावर भगवा फडकविण्यासाठी यशस्वी गाठू कारण मी 18 तास काम करणारा शिवसैनिक आहे. ही खबरदारी घेऊन मतदारसंघात काम करत आहोत. यावेळी अनेक राष्ट्रवादी पक्षातील महिलांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी जि.प. सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, अभय पाटील, मुकूंद बिल्दिकर, दीपक राजपूत, प्रकाश सोमवंशी, दिनकर देवरे, पंढरीनाथ पाटील, बुरा पाटील, विकास पाटील, नगरसेवक सतीश चेडे, गणेश परदेशी, डॉ. प्रमोद पाटील, बंडू चौधरी, संदीपराजे पाटील, अनिकेत सुरवंशी, जितू पेंढारकर, भरत खंडेलवाल, राजू पाटील, मंदा पाटील, सुनंदा महाजन, ऊर्मिला शेळके, किरण पाटील, सुषमा पाटील, करुणा चेडे, स्मिता बारावरक, जया सुरवाडे, प्रीती सोनवणे, ज्योती सोनवणे, गीता मोरे, सुनीता पाटील, रुपाली अमूर्तकर, पडम पाटील, कल्पना पाटील, रत्ना पाटील, संगीता पाटील, मीना तुपे, चंदा ठाकरे, उर्वशी गोहील, मीनाक्षी मोरे, ज्योती मिस्त्री यांच्यासोबत जि.प. सदस्य, प.स सदस्य नगरसेवकांसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख उपस्थिती होते.

Protected Content