कासवे ग्रामपंचायतीचे २ सदस्य अपात्र : जिल्हाधिकारी यांचे निर्देश

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील कासवे ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण बांधकाम करून रहिवास केल्याप्रकरणी लताबाई पंढरीनाथ सपकाळे आणि पवन पंढरीनाथ कोळी या दोन्ही ग्राम पंचायत सदस्यांना अपात्र करण्याचा निर्णय महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी दिला.

 

कासवे ता.यावल येथे ग्रा.प.सदस्य लताबाई पंढरीनाथ सपकाळे आणि पवन पंढरीनाथ कोळी यांनी ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण बांधकाम करून रहिवास करीत आहेत. त्यानुसार त्यांना अपात्र करण्यात यावे, आणि ग्राम पंचायत सदस्य लताबाई सपकाळे आणि पवन कोळी तसेच ग्रामसेवक यांच्या विरोधात विनोद श्रावण कोळी यांनी ग्राम पंचायत  विवाद अर्ज क्र. ५२/२०२१ नुसार जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रार अर्ज सुनावणीअंती लताबाई पंढरीनाथ सपकाळे आणि पवन पंढरीनाथ कोळी यांनी ग्रा.पं. जागेवर अतिक्रमण केल्याचे सुनावणीदरम्यान सिद्ध झाले. त्यानुसार लताबाई पंढरीनाथ सपकाळे आणि पवन पंढरीनाथ कोळी हे महाराष्ट्र ग्रा.पं. अधिनियम १९५९ कलम १४जे -३ व १६ नुसार कासवे ग्रा.प. सदस्य पदावर राहण्यास अपात्र असल्याचा निर्णय महसूल उपजिल्हाधिकारी भारदे यांनी दिला.

Protected Content