अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून अमळनेरात क्रांती दिनी सामूहिक राष्ट्रगान आयोजीत करण्यात आले आहे.
यंदा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे. यात ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान स्वराज्य महोत्सव साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रम घेण्याचे जाहीर करण्यात आले.
या उपक्रमाच्या अंतर्गत, क्रांती दिन म्हणजे ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शाळांमध्ये विद्यार्थी सामूहिक राष्ट्रगीत म्हणतील. तसेच तिरंगा चौकात राष्ट्रध्वजाखाली पोलिस, होमगार्ड, एनसीसी, स्काऊट, एनएसएसचे विद्यार्थी, इतर विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत होईल. यासोबतच पालिकांच्या १८ प्रभागातील घंटागाड्यांवरील स्पीकरमधून, शहरातील शाळांमधील स्पीकरद्वारे एकाचवेळी सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत सादर करण्यात येणार आहे.
अमळनेरकरांनी या उपक्रमात सहभागी होण्याची आवाहन प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे. याप्रसंगी तहसीलदार मिलिंद वाघ, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, बीडीओ विशाल शिंदे, तालुका कृषी अधिकारी भारत वारे, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचार्यांची उपस्थिती होती.