चोपडा आगारातील चालक व वाहकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  चोपडा आगाराची,चोपडा बदलापूर बस क्रमांक MH-20BL 3406 ही नाशिक-बदलापूर अशी प्रवास करत होती.या दरम्यान नाशिक वरून प्रतीक मेहेर हा प्रवास करीत असताना त्याचा महागडा मोबाईल गाडीत राहिला. ही बाब चालक R.S. भामरे,व वाहक S.V PATIL यांच्या निदर्शनास आली. प्रवाशी बदलापूर स्थानकावर उतरून मार्गस्थ झाला.

मात्र काही वेळाने त्याच्या लक्षात आले की आपला मोबाईल हरवला आहे. त्याने आपल्या नंबरवर कॉल करून विचारणा केली असता वाहक एस व्ही पाटील यांनी मोबाईल बस मध्ये सापडला आहे व तो आमच्याकडे असून,आपण येवून घेऊन जावे असे सांगितले.सदर प्रवाशीने बदलापूर बसस्थानक गाठले व मोबाईल ताब्यात घेतला. मोबाईल सुखरूप परत मिळाल्याने त्याच्या चेहऱ्यावर स्मित हसू आले. इमानदारीने आपला भ्रमणध्वनी परत मिळाल्याने प्रतीक मेहेर याने चालक व वाहक यांचे आभार मानले.दरम्यान, एसटी बस वाहक एस व्ही पाटील तसेच चालक आर एस भामरे यांचा प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content