हद्दपार असतांनाही भुसावळात आढळून आल्याने चौघांना अटक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आले असतांनाही भुसावळात आढळून आल्याने खरांत बंधूंसह चौघांना अटक करण्यात आली आहे.

माजी नगरसेवक राजकुमार खरात, त्यांचे बंधू राजन खरात यांच्यासह त्यांच्या साथीदारांना भुसावळ पोलीस प्रशासनाने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. मात्र हद्दपार असतांनाही ते शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील समता नगरातील खरात यांच्या घरी पोलिसांनी छापा टाकला.

या पथकात शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक गजानन पडघन, बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या सहकार्‍यांचा समावेश होता. या पथकाला राजकुमार खरात आणि राजन खरात यांच्यासह दोन संशयित तेथे आढळून आले. ही कारवाई काल रात्री नऊच्या सुमारास करण्यात आली. या चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

Protected Content