पाचोरा येथील उर्दू शाळेचा माजी विद्यार्थी ‘एमबीबीएस’ साठी निवड

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जिल्हा परिषद उर्दू मुलींची शाळा पाचोरा येथील शाळेचे माजी विद्यार्थी शेख अबुजर शेख कदिर यांची एम.बी.बी.एस. मध्ये फ्री सीटमध्ये निवड झाल्याने त्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.

 

शेख अबुजर दोन वर्षापासून नीट परीक्षेची तयारी करत होते. मागील वर्षी त्यांना अपयश मिळाले होते. यावर्षी कोटा (राजस्थान) येथे ते तयारी करत होते. यावर्षी त्यांनी नीट मध्ये ५८२ गुण प्राप्त करुन फ्री सीट मध्ये प्रवेश मिळवला आहे. शेख अबुजर हे जिल्हा परिषद उर्दु मुलींची शाळा येते कार्यरत शिक्षक शेख कदीर शेख शब्बीर यांचे चिरंजीव आहे.

 

यावेळी शिक्षक शेख कादिर शेख शब्बीर यांचे पालक म्हणून सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक लुकमान खान उपस्थित होते. शाळेचे विद्यार्थ्यांमध्ये मेडिकल क्षेत्रा संबंधित रुची निर्माण करण्यासाठी व मेडिकल क्षेत्रात उज्वल भविष्य असून या क्षेत्रातुन आपण देश व समाजाची चांगल्या प्रमाणे सेवा करू शकतात असे मार्गदर्शन शेख जावेद रहीम, व इस्राईल खान यांचे मार्फत करण्यात आले.

 

यावेळी जिल्हा परिषद मुलींची शाळेचे मुख्याध्यापक एजाज रऊफ बागवान, जि. प. उर्दू मुलांची शाळा मुख्याध्यापिका शाहीन शेख, नसीम खाटीक शिक्षक, शेख जावेद रहीम, तहसीन देशमुख, इस्राईल खान, वाजीद सर व उपशिक्षिका शाहेदा पटवे, माजेदा अंजुम, शाहेदा हारून अन्सारी, शाइस्ता देशमुख, जि. प. उर्दू मुलांची शाळा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अकील कलंदर शेख , जि. प. उर्दू  मुलींची शाळा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख जावेद शफी, निहाल बागवान, आरिफ बागवान उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जावेद रहीम यांनी केले. यावेळी शेख अबुजर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मोलाचे मार्गदर्शन केले.

Protected Content