विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

शेअर करा !

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील देशमुखवाडी परिसरात राहत असलेल्या महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ९ जानेवारी रोजी घडली होती. तथापि, विवाहितेस आत्महत्या करण्यास परावृत्त केल्याप्रकरणी मयताच्या सासुच्या फिर्यादीवरून एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

याबाबत सविस्तर वृत्त असे की, संगिता हिचा विवाह सन – २००४ मध्ये पाचोरा येथील देशमुखवाडी परिसरातील रहिवासी अनिल पाटील यांचेशी झाला होता. अनिल पाटील हे शहरातील एका खाजगी रुग्णालयात कम्पांऊडर म्हणुन कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपूर्वी संगिता ही खाजगी कामासाठी घराबाहेर गेली असता शहरातील योगेश नरेश पाटील या  रिक्षा चालकाशी ओळख झाली. पहिल्या भेटीपासुनच योगेश पाटील याने संगिता हिस वारंवार शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. संगिता हिने सदरची बाब कुटुंबियांना सांगितली होती. याचे गांभीर्य कुटुंबियाने न घेतल्याने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान दि. ९ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास योगेश हा संगिता हिच्या घरात गेल्याचे घरासमोरच राहत असलेल्या अंजनाबाई राजाराम पाटील (सासु) यांनी बघीतले. त्यानंतर अंजनाबाई ह्या घर कामात व्यस्त होत्या. तद्नंतर दुपारी १:३० वाजेच्या सुमारास अंजनाबाई यांनी योगेश पाटील यास संगिता हिच्या घरातुन बाहेर पडतांना बघीतले. 

त्यानंतर दुपारी ३:३० वाजता मयत संगिताचे पती अनिल पाटील हे घरी परत आल्यानंतर त्यांना पत्नी संगिता हिचा मृतदेह घरातील लाकडी खांबास ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला होता. दरम्यान अनिल पाटील यांच्या आई अंजनाबाई राजाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून दि. १३ जानेवारी रोजी योगेश पाटील याचे विरुद्ध आत्महत्येस परावृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, सहाय्यक फौजदार हंसराज मोरे व पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे हे करीत आहे.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!