मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या काही दिवसांपासून मविआमधील जागावाटपच निश्चित होत नव्हत्या. तिन्ही प्रमुख पक्षांतील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चा सुरू होत्या. शिवसेना व काँग्रेस यांच्यातील मुंबई आणि विदर्भातील काही जागांवर वाद समोर आले होते. त्यामुळे जागावाटपात अडथळा येत होता. परंतु, आता जागावाटप पूर्ण झाले असून महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला आज २३ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन सांगितला.
जागावाटपात काँग्रेस ८५, शिवसेना ८५ तर राष्ट्रवादीला ८५ जागा लढविण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. डावे पक्ष, समाजवादी पार्टी व अन्य छोट्या पक्षांना तिन्ही पक्षांनी आपापल्या कोट्यातून जागा सोडाव्यात, असा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, महाविकास आघाडीत कोण लहान भाऊ आणि कोण मोठा भाऊ यावरून वाद सुरू होता. परंतु, या जागा वाटपामुळे आता हा वादच संपुष्टात आला असून महविकास आघाडीत सर्वच समसमान आहेत.