किनगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण; कीर्तनकारांची मांदियाळी

यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।यावल तालुक्यातील किनगाव बुद्रूक येथील श्रीराम मंदिरात ६ एप्रिलपासून सालाबादाप्रमाणे अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याला ११३ वर्षांची परंपरा लाभली असून, भाविकांसाठी अध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.

सकाळी ५ ते ७ काकड आरती, सायंकाळी ५ ते ७ हरीपाठ, तसेच सकाळी व दुपारी ज्ञानेश्वरी पारायण वाचन होणार आहे. ह.भ.प. मुकेश महाराज नायगावकर हे ज्ञानेश्वरी पारायण करणार असून, रात्री ८ ते १० किर्तनाचा कार्यक्रम रंगणार आहे.

या किर्तन सप्ताहात अनेक नामवंत किर्तनकार सहभागी होणार असून, ह.भ.प. हेमंत महाराज (नांद्रा), ह.भ.प. संजय महाराज (चितोडा), ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज (पुनगाव), ह.भ.प. लक्ष्मण महाराज (तांदलवाडी) आदींचे किर्तन होणार आहे. १३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ह.भ.प. अंकुश महाराज मनवेल यांचे काल्याचे किर्तन होणार असून, सायंकाळी ४ वाजता दिंडी सोहळा काढण्यात येईल.

कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात मृदुंगाचार्य व गायनाचार्य म्हणून ह.भ.प. सुरेश महाराज गंगावणे, ह.भ.प. कैलास महाराज व अन्य भजनी मंडळींचे योगदान लाभणार आहे. श्रीराम मंदिर संस्थान, किनगाव यांनी भाविकांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Protected Content