टोमॅटो भाव नियंत्रणासाठी कृषी विभागाचा प्रयत्न – कृषी आयुक्तालय

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  राज्यात टोमॅटोचे भाव नियंत्रणाबाहेर गेले आहेत. भाव नियंत्रणासाठी कृषी विभाग युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. पुणे कृषी आयुक्तालयाच्या‌ वतीने नुकतीच राज्यातील कृषी अधिकाऱ्यांची यांची बैठक घेण्यात आली. टोमॅटो लागवड, उत्पन्न व भाव याबाबत अधिक वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे. त्यामुळे भाव नियंत्रणात येण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास मदत होणार असल्याचे पुणे कृषी आयुक्तालयाच्या‌ वतीने कळविण्यात आले आहे.

 

जुलै २०२३ मध्ये बाजारात टोमॅटोचे वाढलेले दर लक्षात घेता यावर सविस्तर माहिती आणि उपयोजनेसाठी कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली  १ ते ११ जुलै २०२३ रोजी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, संशोधन संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची बैठक झाली.

 

राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण ५७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४२ हजार हेक्टर रब्बी व उन्हाळी हंगामात सर्वसाधारण १६ ते १७ हजार हेक्टर क्षेत्र असते. यापासून सर्वसाधारणपणे १० लाख मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित असते.

 

सदर बैठकीत टोमॅटो पिकाखालील खरीप २०२३ हंगामातील क्षेत्र आणि उत्पादन याबाबत माहिती तात्काळ सादर करण्याच्या सूचना कृषी आयुक्तांनी दिल्या आहेत. राज्यात डिसेंबर २०२२ ते मे २०२३ दरम्यान टोमॅटो ला बाजारात अतिशय अल्प दर मिळाल्याने डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान ६ ते २ रुपये प्रति किलो, मार्च २०२३ दरम्यान ११ रुपये प्रति किलो व एप्रिल २०२३ ते मे २०२३ दरम्यान ८ ते ९ रुपये प्रति किलोच्या आर्थिक नुकसानीस शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे नवीन टोमॅटो लागवडीवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

Protected Content