मारूळ ते न्हावी रस्ता डांबरीकरण कामाचे आमदार चौधरींच्या हस्ते भूमिपूजन

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील मारूळ ते न्हावी या पाच किलोमिटर मार्गावरील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे शुभारंभ रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते करण्यात आज आले. 

आज शनिवार दि. २० मार्च रोजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेल्या सुमारे १ कोटी ८ लाख रुपये निधी खर्चाच्या रस्ता दुरूस्ती डांबरीकरण कामाचे शुभारंभ आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते भूमिपूजन व कुदळ मारून करण्यात आले.  याप्रसंगी जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, यावल पंचायत समितीचे गटनेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर सोपान पाटील, पंचायत समिती सदस्य सरफराज सिकंदर तडवी, काँग्रेसचे कार्यकर्ते जावेद अली, मारूळ ग्रामपंचायत सरपंच सय्यद असद अहमद जावेद व सर्व ग्राम पंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ याप्रसंगी  प्रामुख्याने उपस्थित होते. बऱ्याच दिवसांपासुन या रस्त्यावर ठीक ठिकाणी खड्डे पडल्याने दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यावरून चालणे वाहनधारकांना फारच जिकरीचे झाले होते. आमदार शिरीष चौधरी यांनी विशेष लक्ष घालुन या मार्गासाठी निधी मंजुर करून प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाल्याने मारूळवासीयांनी त्यांचे आभार मानले.

 

 

 

 

Protected Content